पोस्ट्स

कुणाची हरकत?

 According to width, length and depth of each of yours cognitive horizon..... छ्या....म्हणजे आम्ही वेडे....उगीच आपलं vague बडबड काहीतरी....be a good human म्हणे.... डोंबलाचं.... याचं काय जातंय बोलायला...."good human".... म्हंजे नक्की म्हणणं काय ?....विचारावं तर असं विचित्र उत्तर.... मूर्ख माणूस अगदी... तुमची लांबी रुंदी खोली पाहिली तर खरंच.... मूर्ख माणूस अगदी.... अरे ये आता हा काय बडबडला.... चांगले बना रे चांगले बना.....

IV

 ...काय?... निर्विकार... नि:संग... निपचित... हिरवा गाऊन... हिर्वंच बेडशीट.. हिरवं...हिरवं.... हिरवंकंच...हिरवट.. हिरवसर... Nurse... आणि ही सरळच माझ्या सळसळत्या लालसर वाहत्या जीवनात अलगद घुसलेली टोकदार.... पिवळसर कसलीशी द्रवं.... कसलीशी काय तुला माहित आहे की थोडंसं  सोडियम क्लोराईड आणि पाणीच पाणी हवं तर एखादं जीवसत्व.... तुझ्या वाढल्या देहाला चालवेल एवढं इंधन.... सगळी चक्र मलाच माहित हा तुझा निर्ढाव होरा का बरं गळून पडत नाही....आ वासून अचंबलेले गरीब जीव....नसल्या शक्यतेत रमणं जेव्हा जाचतं....तुझ्या अस्तित्वाला काचतं.... मरेस्तोवर हसावं की.... मरावंच.... hehehehe...you're not in your right mind.... काहीही बोलावं गरजेचं आहे का रे कधीतरी कधीचतरी...प्रयत्न करावा ....ती समोर आहे नं भिंत...तसा...हिरवट...आणी.. आणी ?? ...काय?... निर्विकार... नि:संग... निपचित...